हे जीवन सुंदर आहे भाग ( 1 )

अचानक ठरलं प्रथा च लग्न प्रथाला स्वतःच्या लग्नाची पूर्व कल्पना देखील नव्हती . बहुतेक या कलियुगातील ती पहिली मुलगी होती जिला स्वतःच्या लग्नाची पूर्वकल्पना नव्हती .काय असेल प्रथाचे पुढील भविष्य? 
प्रथा...
        हे जीवन सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे. अस मी म्हणत होते. कारणं मी एक लेखिका होते. होते....
हे लिहिताना थोडं जड जात आहे. मी लेखिका होते कवियत्री होते. मी काही नसूनही खूप काही होते.
                   इयत्ता नववी मध्ये असताना मला एक गोष्ट कळली होती. आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर शिक्षण खूप गरजेचे आहे. या आधीचे नऊ वर्ष दंगा मस्ती खोड्या करतच घालवले. आई-वडिलांनी इमोशनल ब्लॅकमेल पण केलं होतं. काही लोक म्हणत होते म्हणे.. "इतकी मुलगी मोठी झाली आहे तरी इकडून तिकडे फिरत असते." मी मोठे झाले आहे हे मला माहीतच नव्हत. लोकांकडून कळत होतं  की मी मोठी झाले आहे.
कारण विचारांना बोलण्यानं वागण्याने मी लहानच होते. पारख नव्हती जगाची. दहावी मध्ये मी अभ्यास केला खूप अभ्यास केला पण दहावीचा पाया असणारी नववी ही मिस केली. त्यामुळे अभ्यासात कच्च राहिले. याचा प्रभाव दहावीच्या मार्कात पण  पडला. 58% पडले. असं म्हटलं अकरावीसाठी आपण खूप अभ्यास करु. पण अकरावीला ऍडमिशन करू शकले नाही. एक वर्षाचा गॅप टाकू असं सांगण्यात आलं. आई वडिलांचा ऐकायचं हे आधीच ठरवलं होतं .त्यामुळे गप गुमान  गॅप टाकला. त्यांचा सगळं  ऐकत ऐकत लग्नच झालं आणि खूप मोठा पश्चाताप पदरी पडला.  लग्नाच्या आधी  नवरा न पाहिलेली या युगातील मी पहिलीच मुलगी असावी.
 नवऱ्याचे पाय कोण पाहता का? ते मी पाहिले होते, फक्त पाय! प्रत्येक मुलीची एक अपेक्षा असते. "की मला असा नवरा हवा मला तसा नवरा हवा !"ही अपेक्षा भंग झाली होती. शारीरिक संबंध बद्दल काही माहिती नव्हती. ह्या गोष्टी जेव्हा घडल्या ...... या गोष्टी स्वीकारण्या सारख्या नव्हत्या. बलात्कार म्हणतात ना तो हाच . मुलीच्या संमतीशिवाय तिच्या शरीराला हात लावणे बलात्कारच असतो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एखाद्या मुलावर प्रेम होणं हे त्या विवाहित मुलीसाठी पाप असत. लग्न झालं म्हणजे प्रेम सुध्दा  झालं असं होत नाही ना. अपेक्षा भंग होऊन  जे पदरात पडलेल असतं. ते खुप वेदनादायी असतं. या वेदना त्याच माणसाला कळतात इतर कोणी त्या वेदना  स्वप्नात ही पाहू इच्छित नाहीत.