हे जीवन सुंदर आहे भाग 2
प्रथाची लाईफ इतर मुलींसारखी नव्हती पण ती एक मुलगीच होती . त्याच फिलिंग ....
प्रेम कळू लागलं होतं. आकर्षणासारख्या गोष्टी ज्या वयात घडतात त्या वयात माझं लग्न झालं होतं. या वयात मुलींना जे वाटतं ते वाटणं साहजिकच असतं. पण माझ्यासाठी ते गंभीर होत. लग्न झालेल्या नवर्या बाबतीत आकर्षण वाटणे ते वाटलंच नाही. कारण हे माझ्या अपेक्षा बाहेर होत. हा माझा झालेला अपेक्षाभंग होता. अपेक्षित असणाऱ्या गोष्टींकडे मन वळत होत. पण हे मला चुकीचं वाटत होतं. मला मुलांचे प्रपोजल येत होते कित्येक सारे मुले मला प्रपोज करत होते. पण त्यांना नकार होता माझा. माझं लग्न झाला आहे हे त्यांना कदाचित माहीतच नव्हत. "माझं लग्न झाल आहे." हे सांगितल्यानंतर ते चकित होत होते ."एवढ्या लवकर?"
या प्रश्नांची उत्तरं न देता सरळ सरळ मी त्यांना ब्लॉक करत होते . माझ्या चारित्र्याला डाग लागेल अस काही मी वागुच शकत नव्हते.
मला कोणी सोबती नव्हता. मनातील सांगायला कोणी मैत्रीण नव्हती. दुःख तर खुप सार होत . पण व्यक्त होऊ शकत नव्हते . त्यातच मला लिखाणाचा छंद जडला. लहानपणापासूनच कविता लिहायचा नाद होता . आता तो पुर्णपणे साकारत होता. मी काय इतक्या छान कविता करत नव्हते. पण मनातल कविता स्वरुपी वहीत उतरत होते.
माझ्या दुर्दैवी दुःखाला साथ होती वही आणि पेनाची... कविता माझा श्वास होती!