हे जीवन सुंदर आहे भाग 3

  प्रथा मध्यमवर्गीय कुटुंबातून होती . सामान्य मुलगी असामान्य स्वप्न...
 प्रथा : 
           कविता लिहीत -लिहीत कविता नाही. म्हटलं तर मी चारोळी लिहीत होते तेवढेच चार शब्द .नंतर मला आर्टिकल म्हणजे लेख लिहायची सवय लागली छोटे-मोठे लेख मी लिहीत होते. मानवी जीवनावर ,समाजात चाललेल्या गोष्टींवर मी लेख लिहीत होते. पैशाचे झाड मी लिहिलेला लेख मलाच खूप आवडत होता. मी अनेक वेळा विचार केला होता की हा लेख मी  एखाद्या वर्तमानपत्रात द्यावा. पण नाही दिला. नवऱ्याला नाही आवडलं तर? हा नवरा म्हणवणारा प्राणी माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न चिन्ह  होता.  मला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे वेड लागलं होतं. शिक्षण कमी असल्यामुळे हे माझं स्वप्न वारंवार मागे राहत होतं. शिक्षणाच  महत्त्व कळू लागल होत. शाळेत पुन्हा जाऊन बसण्याची इच्छा झाली होती. अजूनही होते ; पण गेलेली वेळ परत आणता येत नाही ना! शाळेचा मनसोक्त आनंद देखील मी कधी घेतला नाही. डान्स ,गायन, विनोद अशा बर्याच सार्या कला मला अवगत होत्या पण कोणत्याही स्पर्धेत मी भाग घेतला नाही. मनातील भीती" स्टेजवर कसं जायचं?" त्यातून आई-वडिलांचा नाकार होता. तसं म्हणायला गेल तर  माझ्या जीवनाला आकारच नव्हता. एक सामान्य जीवन जगत होते .असामान्य स्वप्न , असामान्य इच्छा आणि असामान्य अपेक्षा असामान्य राहणीमान आणि  सामान्य जीवन . एक्टर्स होण्याचा खूप नाद होता. अरे बापरे!! पुन्हा वळून भूतकात गेले. तस ही  माझं मन तिथच रुळत ...शाळेत! शाळेत असताना मी खूप खोडकर दंगामस्ती करणारी मुलगी होते.  शिक्षकांना तस  म्हटलं तर तशी हुशार मुले आवडतात त्यामुळे मी शिक्षकांच्या नआवडीचे होते. तशी मी हुशार होते .अभ्यास केला तर मी हुशार होते. पण अभ्यासापेक्षा इतर गोष्टीच जास्त आवडत होत्या. कुठे डान्स स्पर्धा आहे का बघ .कुठे गायन स्पर्धा आहेत का बघ. कुठे खेळायचाच  नाद, कुठे चित्र विचित्र .... काहीही... पुस्तकांच्या पलीकडचं सार मला आवडत होतं. आणि हे माझ्या घरातील लोकांना आवडत नव्हतं ! मिडल क्लास फॅमिली मधील... तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक फॅमिली मधील  म्हणजे प्रत्येक मुलालाच आपल्या आई वडिलांना जे  वाटतं ना शिकावं  लागत . मुलगा असेल तर तो नालायक होतो आणि मुलगी असेल तर तिचं लग्न लावून दिलं जातं. विषयच संपला.