तुम्हाला प्रत्येक कामात यश येईल..

यश तुमचं असेल. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश येईल. 
        रात्रीची झोप 
यशस्वी होण्यासाठी माणूस खूप खटपट करतो रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतो. अर्धवट झोप , झोप पुर्ण न झाल्याने होणारा चिडचिडपणा !  झोप पुर्ण नाही झाली तर कामांत लक्ष नाही लागत. यासाठी आधी रात्रीची आठ तास झोप घेणे गरजेचे  आहे.
          योग साधना. 
रोज रात्री झोपताना ध्यान( मेडिटेशन) केल्यास शांत झोप लागते. दिवसभर चालणाऱ्या विचारापासून मुक्तता मिळते. 
रोज सकाळी मेडिटेशन केल्यावर दिवस सुंदर ( फ्रेश) जातोच; पण शरीरातील  रोग -व्याधी निघून जातात .

           ओम नमः शिवाय
    ओम नमः शिवाय हा मंत्र खुप प्रभावशाली मंत्र आहे . या मंत्र पठणाने शरीरात उर्जा संचार होतो. ध्यान मुद्रेमध्ये बसुन या मंत्रांचे  पठण  करावे.  
     उर्जा संचार झाल्याने  काम करण्यासाठी उत्सुकता वाढते.